वार्ताहर: लक्की राठोड नांदेड
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येताच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार अंगाला तेल लावून मैदानात उतरले. गावोगावी जाऊन कॉर्नर सभा आणि व्यक्तिगत भेटीवर जोर देणे सुरू झाले. पण अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आले तसे हे इच्छुक उमेदवार अक्षरश भूमिगत झाले. रोज सकाळ संध्याकाळ खेडोपाडी फिरणारे हे उमेदवार आता गेले कोठे? याचा शोध कार्यकर्ता घेत आहे. हॉटेल मध्ये चहा फराळ असो किंवा धाब्यावरील ओल्या पार्ट्या असो! खूब रंगात आले होते. पण निवडणुका अजून वेळ आहे म्हणताच या नेत्यांनी तूर्त खर्च आवरला घेतला आणि पार्ट्याचा सपाटा बंद केला याचा कार्यकर्त्यावर परिणाम झाला असून रोजची चंगळ काही दिवसासाठी थांबली आहे. एकंदरच काय तर सगळी कडे निवडणुकीचे प्रचार यंत्रणा मंदावली असताना पुन्हा या निवाणूकाच्या बिगुल कधी वाजणार? याकडे भावी उमेदवारापेक्षा अतिउत्साही कार्यकर्त्यांच जास्त हुरहूर लागली आहे.





Social Plugin