Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा लाड येथे लोकमान्य व्यायाम शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा आयोजित .



. गुणवंत राठोड कारंजा तालुका प्रतिनिधी

 दि.30 कारंजा शहराच्या क्रीडा विश्वात अग्रणी स्थान असलेल्यालोकमान्य व्यायाम शाळेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त २,३ व ४ जानेवारी रोजी व्यायाम शाळेच्या मैदानावर भव्य अशा आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र व विदर्भातील १६ नामांकित पुरुष संघ सहभाग घेणार असून, कारंजा शहरात क्रीडाप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरीची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व सामने लोकमान्य व्यायाम शाळेच्या युट्युब चॅनेलवर थेट (लाईव्ह) प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहू न शकणाऱ्या क्रीडाप्रेमींनाही स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताव्यायाम शाळेच्या मैदानावर आमदार सईताई प्रकाश डहाके यांच्या हस्ते होणार आहे. 

यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी महेश वाघमोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे तसेच माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभरविवार ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमास आमदार सईताई डहाके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी आणि माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकमान्य व्यायाम शाळेचे पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्य तसेच आजी-माजी खेळाडू परिश्रम घेत असून, शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.