राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा यवतमाळ तथा बांधकाम समितीचे वतीने बोधिसत्व बुद्धविहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन समता मैदान यवतमाळ येथे दि. 28.12 2025 ला करण्यात आले होते. सर्वप्रथम बोधिसत्व बुध्दविहाराचे उद्घघाटन फीत कापुन डॉ. भिमराव आंबेडकर साहेबांनी केले.तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन पुष्पहाराने मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले. भंते जी नागसेन यांनी सामुहिक त्रिसरण पंचशील वंदना घेतली. यानंतर विहाराची पाहणी करण्यात आली. जाहीर धम्मसभेचे आयोजन समता मैदान येथे करण्यात आले. प्रथम डॉ. भिमराव आंबेडकर साहेबानी समता सैनिक दल यवतमाळ चे वतीने सलामी देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रविजी भगत चेअरमन बोधिसत्व बुद्धविहार समिती हे होते. आद.भिमराव आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला.उदघाटकीय भाष्य करतांना साहेब म्हणाले की केवळ समाज बांधवाच्या देणगीतून महाविहाराची निमिती ही इतर राज्य, जिल्हयासाठी प्रेरणा व दिशादर्शक ठरेल. स्वाभीमानी, वैचारीक, एकनिष्ठ तथा सुसंस्कृत घडविण्याचे महान कार्य येथुन घडविणार असल्याने पूढील पीढीसाठी आदर्शवादी असेल.सभेला आद.कैप्टन प्रविण निखाडे आंतरराष्टीय सचिव,आद. जगदिश गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष,आद.एस के.भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष, आद.वसंत पराड राष्ट्रीय सचिव,आद यु.जी. बोराडे राज्याध्यक्ष, आद.पदमाकर गणवीर राष्ट्रीय संघटक, आद.विजयकुमार चौरपगार राज्य संघटक यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.याशिवाय धम्म मंचावर नेताजी भरणे चंद्रपूर,सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आद. मोहन भवरे जिल्हाध्यक्ष यांनी केले. अध्यक्षीय भाषणात आद. रविजी भगत यांनी बोधिसत्व बुद्धविहार निमिर्ती करतानाचा संघर्षमय प्रवास भूमिकासह सर्व लेखाजोगा कथन केला व दानदाते यांचे धन्यवाद मानले.यावेळी आद.रविजी भगत यांचा सत्कार करण्यात आला. नोकरीचा पहिला पगार देणारे तथा एक लाखाचे वर देणगी देणारे यांचाही सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन आद. रुपेश वानखडे यांनी केले तर आभार रंजनाताई ताकसांडे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी चंद्रपूर , वर्धा नागपूर , अमरावती, वासिम , अकोला ईत्यादी जिल्हा पातळीवरील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका शाखेचे पदाधिकारी , व जिल्हा शाखेचे पदाधिकारी, धम्मबांधव, धम्मभगिनी केंद्रीय शिक्षिका,केंद्रिय शिक्षक,बौध्दाचार्य यासह 4000 लोकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.





Social Plugin