Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.रमेश प्रभू यांचे नाव विलेपार्ले मेट्रो स्टेशनला देण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन-मंत्री अँड.आशिष शेलार.



तालुका प्रतिनिधी 

मारोती गाडगे/गेवराई 

      गेवराई (बीड):-  मुंबई-शैक्षणिक,क्रीडा, आरोग्य,राजकीय क्षेत्रात स्वतःला झोकून समरसतेची वृत्ती जोपासणारे माजी आमदार-माजी महापौर डॉ.रमेश प्रभू यांनी शिवसेनेसाठी आपले जीवन समर्पित केले आणि विलेपार्ले ला समृध्द करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले.

   नारायण सर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार,१९८७च्या विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुखं बाळासाहेब ठाकरे यांनी

खारदांड्याच्या शंकर मंदिरात झालेल्या प्रचारसभेत

हिंदुत्वावर मते मागितली, त्यामुळे १९९५ साली निकाल देत या दोघांचा सहा वर्षे निवडणूक लढवण्याचा आणि मतदान करण्याचा  हक्क सर्वोच्च न्यायालयाने काढून घेतला.त्यानंतर डॉ.प्रभू यांचे नाव हिंदुत्वाशी जोडले गेले आणि देशात ही निवडणूक चर्चेत आली.मात्र नंतर त्यांची शिवसेनेने अवहेलना  केली अशी खंत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अँड.आशिष शेलार यांनी काल रात्री पार्ल्यात व्यक्त केली.

तर डॉ.प्रभू यांची कन्या लीना प्रभू यांच्या सूचनेवरून आजच्या पिढीला त्यांचे कार्य समजावे म्हणून “प्रभू महिमा” हे पुस्तक राज्यातील प्रत्येक लायब्ररीत ठेवण्यासाठी आणि त्यांचे नाव विलेपार्ले येथील मेट्रो स्टेशनला देण्याचा पार्लेकरांच्या वतीने आग्रह केला. 

मी निश्चित प्रयत्न करेन असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले. आपला ठसा उमटवण्या डॉ.रमेश प्रभू यांच्या जीवनाची झलक दाखविणारे  नाट्यरूप सादरीकरण

होणारे ते पहिलेच, माजी महापौर असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू–विलेपार्ले (मुंबई) चे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. रमेश प्रभू आणि त्यांची पत्नी, प्रख्यात वैद्यकीय चिकित्सक स्व. डॉ. पुष्पा  प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित “प्रभू महिमा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल रात्री विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित केला होता,त्यावेळी मंत्री शेलार मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.त्याआधी डॉ.रमेश प्रभू आणि डॉ.पुष्पा प्रभू यांच्या कार्याचा आणि प्रेरणादायी जीवनाची झलक दाखविणारे, लीना प्रभू संकल्पित नाट्यरूप सादरीकरण देखील यावेळी सादर केले होते.

यावेळी विशेष अतिथी म्हणून विलेपार्ल्याचे आमदार अँड.पराग अळवणी,तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार-माजी मंत्री गजानन कीर्तिकर, माजी महापौर अँड.निर्मला सामंत प्रभावळकर,प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे विश्वस्त राजू रावळ,डॉ.प्रभू यांचे पूत्र अरविंद प्रभू,कन्या लीना प्रभू आणि सुमारे साडेतीन तास  मोठ्या संख्येने पार्लेकर उपस्थित होते.

आमदार अँड.अँड.पराग अळवणी म्हणाले की,डॉक्टर यांचे जीवनपट आणि कार्य म्हणजे आमच्या साठी एक सिलॅबस आहे.या पुस्तकाने त्यांचे उतुंग व्यक्तिमत्व नवीन पिढीला समजेल.शिवसेना भाजप

युतीसाठी डॉ.रमेश प्रभू यांनी शिवसेनाप्रमुख आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब

देवरस यांची पार्ल्यात रमेश मेहता यांच्या घरी शिवसेनाप्रमुख घेवून जात त्यांची भेट घडवून आणली हा किस्सा त्यांनी सांगितला.१९८७ साली हिंदुत्वावर ते निवडणूक लढले.त्यांची निवडणूक न्यायालयाने रद्द केली,मात्र हिंदुत्व ही एक जीवनशैली असे कोर्टाने सांगितले.हिंदुत्व आज १००० वर्षाची फिलॉसॉफी झाली आहे,आणि या लढ्यात डॉ. रमेश प्रभू यशस्वी झाले असे त्यांनी ठामपणे सांगितले. याप्रसंगी, आळवणी जी हेही म्हणाले की डॉक्टर साहेबांना अपक्ष उमेदवारी दाखल करायचीच नव्हती. आणि शिवसेनेलाही ते नको होतं.‌ बऱ्याच जणांनी त्यांच मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण मला असं वाटतं की जर मातोश्री वर एक भेट झाली असती तर अपक्ष उभ राहण्याची वेळ आली नसती. जेव्हा एक कार्यकर्ता आपले सर्वस्व अर्पण करून एका पार्टीसाठी काम करतो, आणि ती पार्टी त्या कार्यकर्त्याचा मान राखत नाही,‌तेव्हा निश्चितच मन दुखावलं जातं.

गजानन कीर्तिकर यांनी डॉ.रमेश प्रभू यांच्या अनेक आठवणी जागवल्या.त्यांच्या आठवणी पुस्तक रूपाने चिरकाल टिकल्या पाहिजेत असे आवाहन करत त्यांचा आणि पत्नीचा जीवनपट पुस्तक रूपात उलगडल्याबद्दल त्यांनी प्रभू कुटुंबाचे कौतुक केले.

अँड.निर्मला सामंत - प्रभावळकर म्हणाल्या की,

डॉक्टर हे राजकारणातील वेगळे राजकारणी होते.त्यांचा क्रीडा,पर्यावरण,सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि त्यांचा न्यायालयीन खटला वकील म्हणून जवळून बघितला.त्यांच्या जीवनप्रवासात अनेक अडचणी आल्या,त्यावर मात करून त्यांनी आपला ठसा उमटवला असे गौरवोद्गार आपण काढले.


राजू रावळ यांनी बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब देवरस यांची डॉ.प्रभू यांनी घडवलेल्या भेटीचा आपण साक्षीदार होतो.१९८७ च्या पोटनिवडणुकीत प्रचाराला आपण अहमदाबाद वरून शंभू महाराज यांना आणले.१९८७ च्या पोटनिवडणुकीत आरएसएस आणि भाजप आणि 

गुजराथी बांधवांनी डॉ. प्रभू यांना मोलाचे सहकार्य

केले. तर हिंदुत्व एकसंघ राहावे ही त्यांची मनापासून 

इच्छा होती हा किस्सा त्यांनी सांगितला.

आपल्या प्रास्ताविकात लीना प्रभू म्हणाल्या की,

आई आणि बाबा यांच्या कार्याचा आणि प्रेरणादायी जीवनाची झलक दाखविणारे नाट्यरूप सादरीकरणाची संकल्पना माझ्या मनात घर करून बसलेली. या पुस्तकातून अनेक मान्यवरांनी डॉ. प्रभूंचा जीवनपट उलगडला आहे. त्यांचे कार्य आजच्या पिढीला समजावे म्हणून या पुस्तकाची मराठी आणि इंग्रजी भाषेत मी आणि भाऊ अरविंदने निर्मिती केली.त्यांचे कार्य दिपस्तंभा सारखे होते. त्यामुळे त्यांच्या नावाने विलेपार्ले च्या मेट्रो स्टेशनला मंत्री अँड.आशिष शेलार आणि आमदार अँड.पराग अळवणी यांनी सहकार्य करावे असा त्यांनी आग्रह केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी हिंदुत्वासाठी राजकीय हुतात्म्या स्वीकारलेले स्व. डॉ. रमेश प्रभू यांच्या प्रभू महिमा पुस्तकाचे प्रकाशन होत आहे याचा खूप आनंद व्यक्त केला आणि त्यांची आत्ये बहीण, लीना र प्रभू यांच्या मागण्या,  स्व. डॉ. रमेश प्रभूंच्या नावाचं स्थान, मेट्रो स्टेशन/ हॉस्पिटल/ शाळा, कॉलेज प्रशासनाला द्यायला पाहिजे, आणि हे पुस्तक राष्ट्राच्या प्रत्येक संग्रहालय मध्ये पोस्ट करायला पाहिजे, यांना पाठिंबा दिला. 

पाठिंबा दिला.