प्रतिनिधी गोपाल चंदनसे
पातुर तालुक्यातील अती दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या पांडुर्णा येथील शेतकरी सुकराज गणपत डाखोरे वय वर्षे 50 यांनी सतत च्या नापिकी आणि आपल्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून स्वतःचे जीवन चक्र संपवले आहे , दुपारच्या वेळेस घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली
या घटने मुळे शेतकऱ्यांमध्ये खूप आक्रोश निर्माण झाला आहे आणि पांडुर्णा येथील स्थानिक लोकांनी जो पर्यंत शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणार नाही आणि मयताच्या मुलांना सरकारी नोकरीचे आश्वासन मिळत नाही तो पर्यंत त्यांची मयत होणार नाही असे संपूर्ण गावकऱ्यांनी निर्णय घेतला आहे ,
शासनाचे डोके ठिकाणावर आहे का आणि सरकार अजून कर्जमाफी करण्या साठी किती शेतकऱ्यांचे जीवन संपवणार आहे असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे





Social Plugin