Ticker

6/recent/ticker-posts

माळेगावच्या रसिकांना लावणी ची भूरळ....

 


लोहा तालुका ( प्रतिनिधी संतोष चमकुरे लोहा)

नांदेड जिल्हा  लोहा तालुक्यातील दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली माळेगावच्या यात्रेचे आगळ वेगळ महत्त्व आहे  खंडोबाच्या उपासकांसहित  लोककलावंत मोठी प्रमाणात येतात होसे गौसे नौसेसह  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक या ठिकाणी येतात यात्रेला अनेक प्रकारे महत्व आहेच यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे लावणी महोत्सव महाराष्ट्रतील अनेक लावणी साम्राज्ञी या ठिकाणी येतात आणि आपली हजेरी लावतात कळत नकळत लावणीच्या ठेक्यावर आबालवृद्ध ही  थिरकायला भाग पाडतात अनेक वर्षांपासून चालू असलेला हा लावणी महोत्सव जिल्हा परिषद नांदेड च्या सहभागातून पार पडतो आठ ते दहा लावणी फड नित्यनेमाने येतात आणि माळेगावच्या रसिकांना लावणी च्या अदाकारीने भूरळ पाडतात  लावणी महोत्सवामुळे दिवसेंदिवस माळेगावच्या यात्रेच आकर्षण वाढले आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही