कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
मंठा : मराठा सेवा संघाच्या वतीने सिंदखेडराजा येथे होणाऱ्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या अनुषंगाने मंठा येथील संभाजी ब्रिगेड जनसंपर्क कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाचे स्वरूप, आयोजन, जबाबदाऱ्या व जनसहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष काकासाहेब खरात, जालना जिल्हाध्यक्ष संतोष मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत तेलगड, बबन जंजाळ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड, मंठा तालुकाध्यक्ष बाळासाहेब खवणे सर व तालुका सचिव आसाराम झोल उपस्थित होते.
याच बैठकीत मराठा सेवा संघ मंठा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी आकाश भोसले, तालुका सचिवपदी प्रभाकर कऱ्हाळे तर तालुका कार्याध्यक्षपदी पंढरीनाथ काकडे यांची निवड करण्यात आली. संपूर्ण नवीन तालुका कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित व शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





Social Plugin