वडाळी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा स्फोट! लाखोंची हेराफेरी उघड — सचिव जगन्नाथ नागरे यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेड राजा : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वडाळी मधील प्रचंड आर्थिक गैरव्यवहार ग्रामनिधीचा दुरुपयोग,आणि संशयस्पद पद्धदतीने सरकारी निधीचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सचिव , जगन्नाथ नागरे यांच्या विरोधात समोर आले आहेत या बाबत सौं. विद्या कापसे यांनी दि. २७/११/२५ रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेड राजा यांच्या कडे रीतसर तक्रार केली होती तक्रारीत केलेले आरोप एक दोन नव्हे तर थेट विकास निधीतील मोठ्या आर्थिक अनियमितेकडे बोट दाखविणारे आहेत त्या पैकी काही मुख्य मुद्दे,१५वा वित्तआयोग निधी, दलित विकास रस्ते, नरेगा, जलजीवन विकास योजना, आरो प्लांट्स, तसेच बोगस बनावट झालेले घरकुल, तसेच अंगणवाडी अंतर्गत खर्च, असे विविध विकास कामा मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याण्याने आता मात्र चौकशी दरम्यान ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ नागरे मात्र खूप मोठ्या अडचणीत सापडले आहेत तसेच आज तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अधिकारी श्री, गजानन घुगे, ग्रामसेवक, नागरे,व मेहेत्रे मॅडम इंजिनियर पवार यांनी घटनास्थळी येऊन भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून थातूर मातुर चौकशी करून संबंधित अधिकारी यांची पाठराखण करून भ्रस्टाचारस खतपाणी देण्याचे काम केले असून घटना स्थळावरून पलायन केले असल्याने वडाळी गावातील नागरिकांन मध्ये सुद्धा खूप मोठा न्यायकार्य प्रणाली वरती रोष निर्माण होत आहे दरम्यान तक्रार कर्त्या, विद्या कापसे यांनी उच्चं स्तरीय चौकशी ची मागणी केलेली असून तात्काळ दोषी अधिकाऱ्यांना वरती तात्काळ फौंजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असून मला न्याय मिळावा व मला न्याय न मिळाल्यास परत माझे पुढील उपोषण न्याय मिळे पर्यंत सुरु असणार असल्याची माहिती दिली





Social Plugin