प्रतिनिधी सौरभ आहेर
नाशिक : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक प्रभारी नियुक्ती केले असून, नाशिकसाठी माजी आमदार सुनील भुसारा यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर, दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांच्याकडे मालेगाव महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत मनसे व शिवसेना (उबाठा) एकत्र आल्यामुळे त्यांचे बळ वाढल्याने राष्ट्रवादीत काही प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत भाजप वगळता सर्वच पक्षांसाठी चर्चेचे दरवाजे खुले ठेवले आहेत. आता राष्ट्रवादीने निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या केल्याने भुसारा हे लवकरच नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर जागा वाटपाचा तिढा सोडविण्यात येईल.





Social Plugin