जालना प्रतिनिधी संजीव पाटील
आगामी जालना महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीतील घटक पक्षांची महत्त्वाची बैठक आज जालना शहरात पार पडली. या बैठकीत महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविणे, जागावाटप, समन्वय यंत्रणा तसेच निवडणूक रणनिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महायुती एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत सकारात्मक वातावरण बैठकीत दिसून आले.
या बैठकीस भाजपा नेते तथा माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री व आमदार श्री. बबनराव लोणीकर, आमदार श्री. अर्जुनराव खोतकर, माजी आमदार श्री. कैलास गोरंट्याल, माजी आमदार श्री. अरविंदअण्णा चव्हाण, श्री. भास्करआबा दानवे, श्री. ब्रम्हानंद चव्हाण यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती मजबूत नेतृत्व व स्पष्ट विकासात्मक अजेंड्यासह निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. लवकरच पुढील टप्प्यातील बैठका व अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचेही संकेत देण्यात आले.





Social Plugin