Ticker

6/recent/ticker-posts

अंबड खरेदी-विक्री संघाच्या संचालक पदी संजय आबा जाधव याची बिनविरोध निवड!



*धनगर पिंपरी गावकऱ्यांतर्फे भव्य सत्कार समारंभ;मा.खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि कार्यसम्राट आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या मार्गदर्शनात गौरव*

अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ 

अंबड येथील खरेदी-विक्री सहकारी संघात संचालक पदी श्री.संजय आबा जाधव यांची नुकतीच निवड झाली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल धनगर पिंपरी येथील गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

हा गौरव सोहळा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि कार्यसम्राट आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला.श्री.संजय जाधव यांनी खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करावे,अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

त्यांच्या निवडीमुळे परिसराच्या विकासाला अधिक गती मिळेल,असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.संचालक पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी श्री. संजय आबा जाधव यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी धनगर पिंपरी येथील भास्कर नरोडे,पांडुरंग टोम्पे,भानुदास मुळे,गंगाधर आरगडे,नारायण कदम,दामोदर सावंत,नारायण नरोडे,विकास आधे, राजू माने,ईश्वर सावंत,अशोक भोसले,अशोकराव जाधव,बळीराम वरे,रामेश्वर आरगडे,सतीश खांडेकर,बाबासाहेब आधे,शंकर नरोडे,शिवाजी नरोडे,नारायण नरोडे,वाल्मीक आधे,गणेश सुराशे, अशोक भोसले,संतोष खांडेकर,कृष्णा अरगडे, नवनीत मुळे,रामेश्वर टोम्पे,जगताप मामा,विकास खांडेकर,सुमन उपाशे,सुशील खांडेकर,संकेत खांडेकर,शिवाजी मुळे,बद्री बेंद्रे,महेश आरगडे, संजय कोल्हे,ज्ञानेश्वर साळुंके,शिवाजी सारगुडे, गोविंद सावंत,गणेश मोरे,रोहित नरोडे,गणेश आरगडे,सतिश टोम्पे,सतीश साळुंके,योगेश कचरे, ज्ञानेश्वर पुरी व सर्व मित्रमंडळी,प्रतिष्ठित नागरिक, धनगर पिंपरी चे सर्व मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.