Ticker

6/recent/ticker-posts

नळणी शिवारात कपाशीच्या शेतामध्ये गांजाची लागवड.

 


प्रतिनिधी: निरंजन बावस्कर

भोकरदन: कपाशी शेतात गांजा लागवड केलेला ४ लाख९५ हजार किमतीचा१९ किलो ८०० ग्रॅम गांजा भोकरदन पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई नळणी शिवारात केली.

   राजू कचरू सिघल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे, यांच्या शेतात गांजा लागवड केली असल्याची प्रार्थमिक माहिती पोलिस

किरण बिडवे यांना मिळाली त्यावरून डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक किरण बिडवे, नायब तहसीलदार बालाजी पापुलवाड, कृषी सहाय्यक अंकुश भोबे , पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे ,राकेश नेटके कर्मचारी शिवाजी जाधव, लक्ष्मण रानगोते, संदीप भुतेकर, किशोर मोरे, गणेश पिंपळकर, सोमनाथ मंडलिक, ज्ञानेश्वर जाधव फॉरेन्सिक लॅब  ची टीम यांनी नळणी शिवारातील राजू सिंघल यांच्या गट क्रमांक१३५ मधील कपाशीच्या शेतात पाहणी केली परंतु गांजाचे झाडे कुठे लागवड केली आहे हे कळत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी शेवटी ड्रोन कॅमेरेच्या साह्याने कपाशीच्या शेतामध्ये लावलेल्या गांजाची झाडाचा शोध घेतला.