गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या उमेदवार फरिदाबानू शफी पुंजानी प्रदेश उपाध्यक्ष मो. युसुफशेठ मुंजानी यांच्या मातोश्री यांचा विजय झाला आहे. या विजयामुळे कारंजा शहराच्या राजकारणात एआय एमआय एम ची ताकद अधिक बळकट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच शहरात युसूफ शेठ यांचे कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.
सर्वसामान्य नागरिकांसह विविध समाजघटकांनी फरिदाबानू शफी पुंजानी यांच्या नेतृत्वावर विश्वास कौल दिल्याचे या निकालातून दिसून येते. विजयानंतर प्रतिक्रिया देताना फरिदाबानू शफी पुंजानी यांनी कारंजा शहरातील सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल असा विश्वासही त्यांनी दिला





Social Plugin