पत्रकार प्रकाश राजेघाटगे व इतर
बुध दि . [प्रतिनिधी ]
पुसेगाव येथील, रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य के.के. घाटगे यांच्या हस्ते शंभूराज राजेघाटगे यांचा गुलाब पुष्प , महाविद्यालयाचा वेदावती नियतकालिक अंक देऊन सत्कार करण्यात आला . बुध ता . खटाव येथील शंभूराज राजेघाटगे हे पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात बी.कॉम.भाग तीन मध्ये शिक्षण घेत आहे.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्याची इंडियन एअर फोर्स मध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आलेला होता. स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी वडील प्रकाश राजेघाटगे यांची प्रेरणा मिळाल्याचे सत्कार प्रसंगी शंभुराज यांनी सांगितले .सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, खटाव तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश राजेघाटगे , अथर्व राजेघाटगे ,प्रा.डॉ.अनिल जगताप, प्रा.एस.आर.धोंगडे,प्रा.डाॅ.एच.जी.निमसे इ. प्रा.ए.एस.जगताप.उपस्थित प्राध्यापक होते.





Social Plugin