Ticker

6/recent/ticker-posts

हरणवाडी येथे मनरेगा अंतर्गत जलतारा जलसंधारण कामे महाविस्तार ॲप व कृषी योजनेवर माहितीवर बैठक संपन्न



माळाकोळी सर्कल प्रतिनिधी. रामचंद् आचणे 

लोहा तालुक्यातील हरणवाडी येथे मनरेगा कृषी विभाग BRLF आणिwOTR यांच्या संयुक्त विद्यमाने हाय मेघा वॉटर शेड प्रकल्पांतर्गत शेतकरी मार्गदर्शन बैठक घेण्यात आली या बैठकीत जलतारा मृद व जलसंधारण कामे महावितरण कृषी योजनेची माहिती शेतकरी गटाचे महत्व आणि महा डीबीटी पोर्टल या सर्व विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले 

बैठकीत सर्वप्रथम जलतारा या प्रभावी जलसंधारण तंत्राची ओळख करून देताना सांगण्यात आले की पाणी साचणाऱ्या ठिकाणी 5/5फुटरुंदी6फुट खोलीचा खड्डा घेऊन त्यात दगड भरल्यास एक जलतारा तयार होतो एका जलतार्‍यातून सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जमिनीत मुरते त्यामुळे विहीर व बोर मधील जल पातळी वाढण्यास मदत होते हे काम मनरेगाNRM घटकांतर्गत येत असल्याने रोजगार निर्मिती सोबत जल स्रोत टिकविण्यास मोठी मदत होते.

यानंतर मनरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सीसीटी कंपार्टमेंट बंडिंग नाला खोलकरण नाला बांध शेततळे फळबाग लागवड वृक्षारोपण व मृदाजलसंधारण कामे यांची माहिती देण्यात आली या कामामुळे पाणी साठा वाढणे जमिनीची सुपीकता सुधारणे आणि ग्रामीण रोजगार निर्मिती साधे होते हे स्पष्ट करण्यात आले. 

तसेच शेतकऱ्यांना महाविस्तार ॲप संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या ॲपद्वारे पीकनिहाय लागवड तंत्रज्ञान कीड रोग व्यवस्थापन खत नियोजन बाजार भाव बाजार भाव हवामान अंदाज व शासकीय योजनेचे माहिती मिळू शकते फोटो पाठ पाठवून पीक रोगाचे निदान मिळण्याचे सुविधा या ॲप मध्ये उपलब्ध असल्याने उत्पन्न वाढ खर्च बचत सुलभ होते बैठकीत कृषी विभागाच्या पिक विमा फळबाग अनुदान पी एम के एस वाय ठिबक तुषार सेंद्रिय शेती कृषी यांत्रिकीकरण अनुदान व बियाणे खत अनुदान अशा विविध योजनेची माहिती देण्यात आली यानंतर शेतकरी गट स्थापन करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले सामूहिक खरेदी विक्री खर्चात बचत प्रक्रिया सुविधा प्रशिक्षण आणि प्रकल्प अनुदानामध्ये प्राधान्य या फायद्यामुळे शेतकरी गट अत्यंत उपयुक्त असल्याने सांगण्यात आले तसेच महा डीबीटी पोर्टलवरील नोंदणी व अर्ज प्रक्रिया या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी सहाय्यक कृषी अधिकारी मा नागठाणे सर तसेचWOTR  टीम यांच्यातर्फे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले