गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
दिनांक 17.12.2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजता पोहा येथे कु. देवयानी अनिल सुपलकार रा. पोहा यांची राष्ट्रीय हॉकी संघामध्ये निवड झाल्यामुळे त्यांचा शेतकरी एल्गार समितीच्या वतीने डॉ. पंकज काटोले व श्री विलासराव सुरडकर कारंजा तालुका शिवसेना अध्यक्ष यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच त्यांची आई सौ गोकुळाताई अनिल सुपलकार यांचा कारंजा पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती कविताताई सुपलकार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान डॉ. श्री पंकज काटोले, राजु अवताडे अध्यक्ष शेतकरी एल्गार समिती,श्री विलासराव सुरळकर कारंजा तालुका शिवसेना अध्यक्ष,शेतकरी नेते श्री ओमप्रकाशजी तापडिया, समाजसेवक श्री मोतीरामजी तोरकडे, श्री गजाननराव कदम यांनी आपल्या भाषणातून सांगितले की एका साधारण कुटुंबातील मुलीची राष्ट्रीय स्तरावर हॉकी संघामध्ये निवड झाल्याने ही समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे. गावातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व विविध क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती करून आपले भविष्य उज्वल कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. कु.देवयानी यांचे सर्वांनी अभिनंदन करून कौतुक केले. कार्यक्रमास समाजातील महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin