Ticker

6/recent/ticker-posts

नगरसेवक म्हणून आरतीताई जोरदार…मतदार ठाम.

 


रूपेश मार्गे @जिल्हा प्रतिनिधी 

१८ डिसेंबर २०२५ वाशिम,

 

                   वाशिम मध्ये सध्या नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा ऐन रंगात आला असतांना राजकीय नेतेमंडळीची वारी वाशिम च्या दिशेने वळत आहे. त्यामुळे निवडणुकीच वातावरण चांगलच तापल असतांना वार्ड क्रमांक १ मधील खुल्या प्रवर्गातून वंचित च्या चिन्हावर उभ्या असलेल्या महिला उमेदवार कु आरतीताई ठोके यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून एका सर्वे मधे मतदारांची पसंती आरतीताई ठोकेलाच असल्याचे विश्वासू सूत्रांकडून सांगण्यात आले. मतदारांच्या म्हण्यानुसार आरतीताई एक उच्चशिक्षित महिला उमेदवार असून स्वतः एक नेत्या आहेत ज्या स्वतः निर्णय घेण्याची क्षमता ठेवतात. त्यांनी आजूबाजूच्या खेड्यामध्ये शोले स्टाईल आंदोलन करून दारू बंदी सारखे चांगले काम केले. कोणते पद नसतांना जनतेच्या मदतीला धावून जातात. त्यांची हिच पुण्याई आता त्यांना निवडणुकीमध्ये अग्रेसर ठरवत आहे. सोबत सर्व मतदार पण आरतीताई ठोके ला मतदान करण्याचे आवाहन करत आहे