महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड पुणे (१८) डिसेंबर)
१८ डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस तसेच अल्पसंख्याक विकास महासंघ च्या १४ व्या वर्षपूर्ती निमित्त अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सन्मान अल्पसंख्यांक विकास महासंघ तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्ष पदाधिकारी जे अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अहोरात्र पणे जावेद शहा साहेब झटत आहेत, तसेच समाजाला योग्य दिशादेण्यासाठी कुरैशी साहेब मार्गदर्शन करत आहे अशा समाजाभिमुख व्यक्ती विशेष यांना अल्पसंख्याक विकास महासंघ तर्फे सन्मानपत्र , शाल व ,गुलाबपुष्प चे वितरण संस्थापक अध्यक्ष रफीक भाई कुरैशी , पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष जावेद शहा, समरीन कुरैशी यांच्या हस्ते देण्यात आले . तसेच महाराष्ट्र ग्रामीण न्यूज, हिंदी मराठी पत्रकार चे महादेव सोनुने यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून जाहीर करण्यात आले.व त्यांचे रफिक भाई यांचे हस्ते शाल श्री फळ व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला संघटनेचे मान्यवर मारुती काळे , रोहन रोकडे, विकास वाघमारे, शाहरुख खान बरचसे मान्यवर उपस्थित होते.





Social Plugin