Ticker

6/recent/ticker-posts

राहुल जगदाळे यांचे निधन.

       


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

बुध विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक राहुल मधुकर जगदाळे ( वय ४५ वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . राहुलदादा या टोपण नावाने बुध पंचक्रोशीत प्रसिध्द होते . त्यांच्या पश्चात पत्नी , आई - वडिल , भाऊ , मुलगा , मुलगी, भावजय , पुतणे  असा मोठा परिवार आहे . बुधचे माजी उपसरपंच मधुकर राऊ जगदाळे यांचे सुपुत्र व युवा नेते संतोष जगदाळे यांचे मोठे बंधू होते .  अंतविधीसाठी बुध पंचक्रोशीतील राजकीय,सामाजीक , शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते  रक्षा विसर्जन व दशक्रिया विधी शुक्रवार दि . ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ . ३० वाजता बुध येथे होणार आहे .