Ticker

6/recent/ticker-posts

कोकणामध्ये थंडीचा कहर आंब्याला चांगला मोहर येण्याची शक्यता

 


अमोल शिर्के कलंबई प्रतिनिधी 

 तालुका देवगड व कोकणामध्ये सध्या थंडीची लाट चालू आहे. कोकणामध्ये थंडीची सुरुवात पाऊस संपल्यानंतर जी झालेली आहे ती आता थंडीमध्ये रूपांतरीत झालेली आहे. परिणामी आंब्याच्या झाडाला चांगला मोहर येताना दिसत व फुलताना दिसत आहे. अशी ही थंडी समाधानकारक राहिल्याने आंब्याला पोषक असे वातावरण मिळणार आहे. कारण थंडी जर व्यवस्थित असेल तर आंब्याचे पीक म्हणजे त्याची कणी जी आहे त्याची सेटिंग व्यवस्थित होते.

 अति थंडी सुद्धा आंब्याच्या झाडाला घातक असते कारण अति थंडीमुळे त्यातल्या आंब्याच्या कणीची गळ होऊ शकते म्हणून थंडीही समतोल प्रमाणात आढळणारी असावी असे शेतकऱ्यांचे मत आहे. कोकणात थंडीचे प्रमाण चालू झाल्यावर समुद्रावर सीगल पक्षी हे पाहुणे यायला चालू होतात त्यांचे संख्या थंडीच्या दिवशी भरपूर प्रमाणात समुद्रावर दिसते असे हे सीगल पक्षी समुद्राच्या काठावर पाहुणे म्हणून दरवर्षाला हजेरी लावतात व पर्यटकांना ते आकर्षक म्हणून दिसतात. कोकणामधील थंडी ही अतिशय उल्हासदायक व चैतन्यपूर्ण अशी  असते. बहुसंख्या पर्यटक या थंडीच्या मोसमात फिरायला कोकणातील निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ बघायला येतात. कोकणातील थंडी साधारण अशी महाशिवरात्रीपर्यंत असते.