प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
दि.6 डिसेंबर 2025 वार शनिवारला विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ' स्वरसम्राट जनजागृती कला मंच,आंध्रुड ' तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांचा अभिवादनपर प्रबोधनात्मक संगीत गायन कार्यक्रम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श गाव पांगरखेड ता.मेहकर जि.बुलढाणा या ठिकाणी संपन्न झाला.
थंडीचे दिवस असताना सुद्धा महिला, पुरुष आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने अभिवादन कार्यक्रमाला हजर होते .सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आणि त्यांच्या विचारावरच मार्गक्रमण करण्याचा संकल्प घेतला. 18 तास अभ्यास करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मॉड्युल सर्वांना आवडले. असाच आम्ही पण अभ्यास करूया अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. त्याचप्रमाणे मोबाईलचा अतिवापर न करण्याचा संकल्प सुद्धा यावेळी घेण्यात आला. पुस्तके हेच आपले खरे मित्र आहेत,हे सर्वांनी जाणून घेतले.
शाहीर भीमराव अंभोरे ,साहेबराव अंभोरे व दत्ता पवार यांनी उजाड राणी किमया केली मोठी, मानवा जा बुद्धाला शरण, कुणी नाही केलं भलं व माय, शेजारीण सखे बाई, काहो नेत नाही, नांदण नांदण, बाबासाहेबानी दिलं रे बाबासाहेबांन, होता भिमराव लय दिलदार, अरे सागरा, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे,सहा डिसेंबर छप्पन साली अशी एक से बढकर एक गीते सादर केली.
महाराष्ट्राचे प्रख्यात बँजोवादक प्रभू डोके, ढोलक मास्टर दीपक इंचाळ व राहुल पवार यांनी साथसंगत दिली तर कोरस दगडू पवार, सत्यभामाबाई कांबळे, आशाताई टेकाळे यांनी केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूपनंदा महिला उपासिका संघ, पंचशील नवयुवक मंडळ ,बापूरावजी शिंगणे,मनोज भाऊ शिंगणे व मित्रमंडळींनी सहकार्य केले. सागर भाई बेलगाव यांनी साऊंड ची उत्तम व्यवस्था केली.
या कार्यक्रमातून पर्यावरण जनजागृती, सामाजिक सलोखा,बंधुता,मोबाईलचा अतिरेक टाळणे,पुस्तकांशी मैत्री असा संदेश समाजामध्ये गेला.





Social Plugin