प्रतिनिधी गोपाल चंदनसे
महावितरण विभागाला वेळोवेळी सांगून सुद्धा 3 फेज लाईटचा. प्रश्न मार्गी लागत नाही आहे आणि शेतकऱ्याला 8 तास लाईट मिळत नाही तेव्हा सामजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी आलेगाव सप्टेंशन वर धडक मोर्चा नेला आणि कार्यालय मधील गावंडे साहेब तसेच वरिष्ठ अधिकारी बांधवांसमोर विविध समस्यांचा पाढाच , शेतकरी बांधवांच्या उपस्थिततीत मांडला.
अनेकवेळा तार तुटले, फ्यूज गेला सारखे वारंवार सांगून सुद्धा शेतकरी बांधवांना दोन दोन दिवस लाईन दुरुस्त करून मिळत नसल्यामुळेलाईन अभावी पाणी योग्य वेळी पिकाला मिळू न शकल्यामुळे शेतकरी बांधवांच्या पिकाचे चौंढी फिटर परिसरात अंधारसांगवी, पांडुर्णा, सोनुना, पिंपळडोळी, नवेगाव येथे नुकसान होत आहे.अतिदुर्गम असलेल्या गावासाठी पूर्णवेळ लाईनमन हवा आहे. तिथे महिला लाईनमन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हे पूर्णतः चुकीचे आहे.
महिला असल्यामुळे कुठल्याच शेतकरी बांधवाकडे त्यांचा संपर्क नंबर नाही आहे. दिवसा 12 तास शेतकरी बांधवांना लाईन मिळायला हवी परंतु शेतकरी बांधवांना केवळ 6 तास लाइन मिळते आणि ती सुद्धा फ्यूज गेला, तार तुटली.... लाईन मन कर्मचारी सुद्धा दर्जेदार काम करण्याऐवजी थातुर मातुर काम करून विषय अर्धवट सोडून ठेवतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच फ्यूज गेला आणि वायर तुटली....
ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचे आतोनात हाल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे होत आहे. शेतकरी बांधवांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आजचा धडक मोर्चा निघालेला आहे.
सुरेश ताजने आणि समाधान डाखोरे यांनी शेतीला लाईन अपुरी पडत असल्यामुळे गहू, हरभरा सुकून जात आहेत. आम्हाला जी आठ तास लाईन मिळत आहे ती किमान आठ तास तरी मिळायला हवी असे मनोगत व्यक्त केले आहे. शेतकरी बांधवांच्या वतीने महावितरणचे गावंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.आलेगाव महावितरण सबस्टेशनचे कार्यकारी अभियंता गावंडे साहेब यांनी पुढील दोन दिवसांत कापकर यांनी निवेदनामध्ये दिलेल्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.
कापकर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार मानून धडक मोर्चा थांबवला अंधारसांगवी गावचे सरपंच साईनाथ देवकर, तथा समाधान राठोड, संतोष चौरे, कैलास कुरुडे, महादेव देवकर, सुरेश ताजने, देवानंद चौरे, समाधान डाखोरे, रवींद्र नफ्ते, अशोकराव नफ्ते, महादेव जामकर, गजानन चौरे, कमल चव्हाण, भागवत चव्हाण, समाधान नफ्ते, प्रदीप नफ्ते, सिताराम राठोड, गजानन राठोड, देविदास पवार, गजानन देवकर, विक्रम ढोके, अनिल चौरे, उकंडा शिंदे,भगवान बंडू चौरे, रमेश चौरे, ब्रम्हदेव चौरे, राजू आत्माराम देवकर, राजू राठोड, हिराशिंग राठोड, तारासिंग राठोड, इत्यादी प्रमुख शेतकरी बांधव उपस्थित होते.





Social Plugin