बुध , दि. [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेत व परमपूज्य श्री नारायणगरी महाराजांच्या पुण्यतिथि निमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात पंजाब येथील कोहली आखाड्याच्या पै. शानवीर कोहली याने पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पै . दादा शेळके याला एकलंगी डावावार चितपट करत आस्मान दाखविले .
या चटकदार कुस्तीमुळे कुस्तीप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले . पुणेच्या अंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पै. हर्षवर्धन सदगीर व हरियाणा येथील कॅप्टन जोरासिंग आखाड्याचा पै .दिनेश गुलिया याची श्रीसेवागिरी केसरीचा किताबाची कुस्ती बरोबरीत सोडविली . पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पै . रविराज चव्हाण याने दिल्लीच्या गुरु हनुमान आखाड्याचा पै . जॉन्टी गुज्जरला सवारी डावावर आस्मान दाखविले . . तर अमृतसर येथील कोहली आखाड्याचा पै . लकी कोहली याने कोल्हापूर येथील गंगावेश तालीम कोल्हापूरच्या पै. कालिचरण सोलनकर याला चितपट केले . अकलुजच्या शिवनेरी तालीमचा पै. सतपाल सोनटक्के याने जेऊरच्या पै . समीर शेख याला घुटना डावावर आस्मान दाखविले. पुणे येथील गुरू हनुमान आखाड्याचा पै . धनाजी कोळी याने कोल्हापूर येथील शाहुुपुरी तालिमचा पें धिरज पवार याला गुणावर हरविले . बुध येथील सहयाद्री कुस्ती संकुलनचा पै . महेश कुंभार याने दिल्ली येथील छात्रसाल आखाडयाचा पै . प्रणित कुमार याला हप्ते डावावर चितपट करून प्रेक्षकांच्या डोळयाचे पारणे फेडले . सांगली येथील भोसले व्यायामशाळेचा पै . प्रशांत शिंदे व इचलकरंजी येथील व्यंकोबा तालिमचा प्रशांत जगताप याची कुस्ती बरोबरीत सोडवली . याने सांगली येथिल भोसले व्यायामशाळेचा पै . प्रशांत शिदे याला एक लंगी डावावर आस्मान दाखविले .. रात्री उशिरा पर्यंत शेवटची कुस्ती पाहण्यासाठी हजारो रसिकांनी हजेरी लावली .
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने यात्रास्थळावर उभारलेल्या कुस्त्यांच्या प्रशस्त क्रीडागणांवर दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या कुस्त्यांचा जंगी आखाडा रात्री दहा वाजता संपला. या कुस्ती आखाड्यात उत्कृष्ट बैठक व्यवस्था व लाईटची उत्तम सोय ट्रस्टने केली होती. कुस्त्या पाण्यासाठी हजारो कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती. अनेक कुस्त्या डोळ्याची पापणी लवताच क्षणी पैलवानानी आपल्या प्रतिस्पध्यांवर डाव प्रतीडाव करत कुस्त्या जिंकल्या अनेक लक्षवेधी लढती पाहताना तसेच शेवटच्या टप्यातील कुस्त्या पाहताना तर कुस्ती शौकीनांचा श्वास थांबला होता.
या आखाड्यात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पैलवानांनी चटकदार कुस्त्या झाल्या. या कुस्ती आखाड्यात विविध कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.आंतरराष्ट्रीय पातळीवरील मैदाने गाजवलेल्या नामांकित पैलवानांनी पंच म्हणून काम पाहले,प्रारंभी दुपारी ३ वाजता श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ , विश्वस्त डॉ . सुरेश जाधव , रणधीर जाधव , संतोष जाधव , सचिन देशमुख , गौरव जाधव, कुस्ती समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थित कुस्त्यांचा इनाम श्री सेवागिरी मंदिरातून वाजतगाजत आखाड्यात नेण्यात आला.






Social Plugin