टेंभुर्णी राजुर रोडवर घडली घटना
जालना- टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
अद्रक काढणीसाठी बदनापूर तालुक्यातील चिखली येथून टेंभुर्णी कडे राजूर मार्गे येणाऱ्या मजुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला गुरुवारी (ता.१८) सकाळी अपघात झाला. यामध्ये टेम्पो व स्कुटीची धडक होऊन स्कुटी चालक रमेश किसन जाधव (रा. टेंभुर्णी) जागीच ठार झाले तर मजुराचा टेम्पो पलटी झाल्याने टेम्पोतील मध्यप्रदेश मधील 18 मजूर जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जालना येथे हलविण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की अद्रक काढणीसाठी मध्य प्रदेशातील मजूर टेम्पोद्वारे (क्रमांक एच ०६ एजी 48 77) चिखली (ता. बदनापूर) येथून जाफराबाद तालुक्यांमध्ये राजुर मार्गे येत होते.
यावेळी टेंभुर्णी येथील शेतकरी रमेश किसन जाधव (वय55) हे स्कुटी (क्रमांक एम एच 21 सीएफ 69 34) वरून शेतात जात असताना मजुराचा टेम्पो व स्कुटीची धडक झाली यामध्ये स्कुटी चालक रमेश जाधव यांचा जागेवरच मृत्यू झाला दरम्यान जोराची धडक असल्याने समोर जाऊन टेम्पो पलटी झाला यामध्ये मध्यप्रदेशातील विक्रम आवासे, गणेश आवासे, देवसिंग जाधव, कुमसिंग आवासे, बिलात आवासे, महेश आवासे, आकाश चव्हाण, समीर तारवे, परी आवासे, अनिता आवासे, बळीराम आवासे, रोहित चव्हाण, रंजीला चव्हाण, राधिका दावत, रूपसिंग आवासे, रूपाल खिसुके, व मोलीबाई आवासे यांचा जखमीत समावेश आहे. रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून जालना येथे हलविण्यात आले. दरम्यान दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रक पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.
.jpg)





Social Plugin