*सोनोशीमध्ये गोमांस विक्री प्रकरणी इसम अटक– किनगाव राजा पोलीसांची धडाकेबाज कारवाई!*
*सिंदखेडराजा/ज्ञानेश्वर तिकटे*
सिंदखेडराजा :- तालुक्यातील सोनोशी परिसरात उघडपणे गोमांस विक्रीचा प्रयत्न केल्याप्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी एकावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 03 डिसेंबर 2025 रोजी सकाळी अंदाजे 10.35 वाजता, सोनोशी गावात एक इसम संशयास्पदरीत्या गोमांस विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपासणीअंती पिशवीत गोमांस असल्याचे उघड झाले. आरोपी शेख सकावत शेख गफ्फार (वय 50, रा. दुसस्बीड, ता सिंदखेडराजा) या आरोपीस ताब्यात घेतले
त्यानंतर आरोपीसह मुद्देमाल ₹ 4,600 किमतीचे गोमांस, तराजू, वजनकाटा, कुऱ्हाड जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले पशुवैद्यकीय अधिकारी, सिंदखेड राजा यांनी तपासणी केल्यानंतर, जप्त केलेले मांस गोमांस असल्याची शक्यता असल्याने त्याचे केमिकल तपासणीकरिता नमुने घेतले आहेत. सरकार तर्फे पो को जीवन जायभाये यांनी फिर्याद दाखल केल्याने आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई कायमी अप. क्र. 319/2025 कलम 271 भा.न्या.सं. सह कलम 5(क), 9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये करण्यात आली आहे. गुन्हा दुपारी 3.27 वाजता नोंदवला गेला असून, तपास ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. विश्वास काकड यांच्या कडे देण्यात आला आहे





Social Plugin