बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त रविवारी (ता. २१) पहाटे सहा वाजता श्री सेवागिरी मॅरेथॉनचे भव्य आयोजन केले आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ यांनी केले.
अंतर १० किलोमीटर स्पर्धेत महिला व पुरुष गटात वय वर्षे १८ ते ३०, ३१ ते ४०, ४१ ते ५०, ५१ ते ६०, ६१ ते पुढे प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. अंतर ५ किलोमीटर ओपन गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना चषक दिला जाईल. प्रत्येक गटात महिला व पुरुषांची वेगळी स्पर्धा होईल. सर्व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी दिली जाईल.
या स्पर्धेची सुरुवात दहिवडी रोडवरील कृषी प्रदर्शनजवळील यात्रा स्थळावरून होईल. इंटरनॅशनल दर्जाचा उत्कृष्ट रूट हैसपोर्ट असेल. सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, मेडल व अल्पोपाहार दिला जाईल. पाच किलोमीटर अंतरासाठी ३०० रुपये, तर दहा किलोमीटर अंतरासाठी ५०० रुपये प्रवेश फी राहील. स्पर्धकाकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी अर्ज येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे कार्यालय, काटकर बाल रुग्णालय, प्रभात टी डेपो, बापू हलवाई या ठिकाणी मिळतील. ऑनलाइन नावनोंदणी https://alpharacingsolution. com/e/SHRI-SEVAGIRI- RUN-25 या संकेत स्थळावरून करता येईल. नावनोंदणी रविवारपर्यंतच (ता. ७) राहील. मॅरेथॉन एक्स्पो १९ व २० डिसेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत काटकर बालरुग्णालय पुसेगाव येथे असेल.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने व मॅरेथॉन कमिटी विशेष परिश्रम घेत आहेत.
.jpg)




Social Plugin