Ticker

6/recent/ticker-posts

विजेच्या धक्क्याने बकरी ठार, महावितरण चा हलगर्जीपणा .

 


महेंद्र वानखडे ग्रामीण प्रतिनिधी

 विद्युत रोहित्राच्या संरक्षण कुंपणामध्ये आलेल्या विद्युत प्रवाहामुळे प्राणांतिक अपघात होऊन एका बकरीचा मृत्यू झाल्याची घटना पातुर तालुक्यातील चान्नी येथे घडली. सस्ती उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या महावितरणच्या चान्नी येथील एका रोहित्राला संरक्षण कुंपण लावण्यात आले असता त्यात जिवंत प्रवाह असल्यामुळे चारा खाण्यासाठी गेलेली नामदेव गायकवाड यांची एक बकरी प्रवाहित कुंपणाला चिटकल्यामुळे जागीच गतप्राण झाली आहे. त्यामुळे गायकवाड यांचे पंचवीस हजार रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 महावितरणचे सस्ती उपकेंद्र हलगर्जी करण्यात आघाडीवर असून मागच्या पंधरा दिवसातच पिंपळखुटा येथील संतोष अर्जुन वानखडे यांचा साठ हजार रुपये किमतीचा बैल तुटलेल्या ताराच्या संपर्कातील गतप्राण झाला होता. त्या घटनेची पुनःरावृत्ती आजच्या घटनेने पुन्हा झाली आहे.

 महावितरणच्या अनागोदी कारभारामुळे गावोगावी अपघाताचे प्रमाण वाढत असून तक्रारी देऊन सुद्धा कसलीही सुधारणा होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उघडे रोहित्र असणे, खांबावर गार्डनिंग नसणे , तारा अगदी खाली असणे, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे या समस्या महावितरण च्या आशीर्वादाने नागरिकांना सोसाव्या लागत असून उद्या जर पशुऐवजी एखाद्या माणसाचा जर अपघाती मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण राहील ?