Ticker

6/recent/ticker-posts

रणसिंगवाडी येथे श्री भैरवनाथ मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.



बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

रणसिंगवाडी (ता. खटाव) येथे श्री भैरवनाथ-जोगेश्वरी, श्री लक्ष्मीमाता, श्री हनुमान, श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज मूर्ति प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा रविवारी उत्साही वातावरण मध्ये साजरा झाला  त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविकांनी सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचा, दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला

कलशारोहन व मूर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शनिवार (ता. 29) रोजी दुपारी 4 वाजता सनई चौघडे व पारंपरिक वाद्यांच्या साथीने देवतांच्या मूर्त्यांची ग्रामप्रदक्षिणा (शोभा यात्रा) निघाली. रात्री 10 नंतर त्रिवेणी संगम भजन मंडळ बुध, डिस्कळ, राजापूर, भजन मंडळ वेटणे व रणसिंगवाडी यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला..

रविवारी (ता.30) सकाळी सात ते दुपारी तीन वेदशास्त्रसंपन्न नंदकुमार जोशी वरुडकर, विलास कुलकर्णी काका निढळ व सहकारी यांच्या पौराहित्याखाली शास्त्रोक्त पद्धतीने सर्व धार्मिक विधी संपन्न झाले.

दुपारी 2ते 3 या वेळेत पंचदशनाम जुना आखाडा, वाराणसीचे पूर्व आंतरराष्ट्रीय महामंत्री तथा बिलेश्वर महादेव मंदिर, वडीयावीर, गुजरातचे थानापती महंत श्री शांतिगिरीजी महाराज व अकलूज येथील श्री ज्ञानाई गुरुकुलचे संस्थापक-अध्यक्ष ह.भ.प.सुरेशजी सुळ महाराज यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्ति प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा संपन्न झाला. दुपारी दोन वाजता साधु महात्म्यांचे आशीर्वाचन व दर्शन सोहळा झाला दुपारी तीन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी 4 ते 5 वाजता गावातील साधारणतः 750  माहेरवासिनिंचा साडी चोळी देवून सन्मान  व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात  आले होते.  रात्री  9 ते 11 वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील ह.भ.प. संजय महाराज साळुंखे निगडीकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.

   सोमवारी रात्री  8 वाजता  प्रीतम लोखंडे प्रस्तुत होम मिनिस्टर  खेळ पैठणी चा   कार्यक्रम  झाला. यावेळी बहूसंख्येने  महिला उपस्थित होत्या.

यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी भजन, हरिकीर्तन व अन्नदान अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. यावेळी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. खूप मोठ्या प्रमाणात गावात पाहुणे मंडळी व मान्यवर आली होती.रणसिंगवाडी ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले . स्वागत केले. या वेळी नामदार महेश शिंदे उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास  महामंडळ, डॉ प्रियाताई  शिंदे, नामदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस शिंदे, व अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक,व्यावसायिक    विविध क्षेत्रातील  मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण गाव, मुंबईकर संघटना, ग्रामस्थ एकत्र आले होते.