Ticker

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड येथील ,ओबीसी ‘ब’ प्रवर्गात गणेश रामराव ढाकणेसर यांची दुसऱ्यांदा दमदार तयारी, कार्यकर्त्यांचा खंबीर पाठिंबा



महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी पिंपरी चिंचवड 

पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून गणेश ढाकणेसर यांनी या प्रभागातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, ओबीसी ‘ब’ प्रवर्गासाठी ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. पक्षा कडून त्यांची जोरदार तयारी चालु आहे...

गणेश ढाकणेसर हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून, ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर ते दुसऱ्यांदा काम बघत आहेत. यापूर्वीही त्यांनी ओबीसी घटकांसाठी विविध सामाजिक व संघटनात्मक जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. प्रभागातील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, युवकांचे प्रश्न तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे.

त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आगामी निवडणूक लढविण्याबाबत त्यांची इच्छाही पूर्णपणे ठाम असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवत आलेल्या गणेश ढाकणे यांना प्रभागातील नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ओबीसी ‘ब’ प्रवर्गातून त्यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

आगामी काळात भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 21 मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. यांना मोठा जनाधार मिळत असल्याचे दिसून येत आहे. नागरीका बरोबरच प्रभागातील भाजपचे  पदाधिकारी व कार्यकर्ते गणेश सर यांना उमेदवारी देण्यात यावी या साठी लढत आहे त्यांच्या कारकिर्दी नुसार त्यांनाच उमेदवारी द्यावी हीच सर्वांची इच्छा आहे,,.