कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
मंठा: दिनांक 01 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माळकिनी येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक जाधव,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नुतन मंठा केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी देशमुख व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शिक्षक संघांचे राज्यकोषाध्यक्ष उत्तम वायाळ, शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष बाबासाहेब इंगळे उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भगवान जायभाये यांनी प्रास्ताविकेमध्ये शाळेच्या आगामी योजना,उपक्रम आणि विध्यार्थ्यांच्या गुणवत्तेची माहिती देऊन शाळेच्या रंगरंगोटी साठी लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन केले.तसेच केंद्र प्रमुख शिवाजी देशमुख व उत्तम वायाळ यांनी देखील पालकांना लोकवर्गणीचे महत्त्व व गरज समजावून सांगितले. त्यास गावकऱ्यांनी देखील शाळेच्या विकासासाठी लोक वर्गणी जमा करून देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदिप धामणे व आभार प्रदर्शन श्रीनिवास सुदेवाड यांनी केले.





Social Plugin