Ticker

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जि.प.हायस्कूल, मंगरुळ नवघरेचे कलाशिक्षक रामेश्वर तोंडे द्वितीय .



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

शिक्षण विभाग पंचायत समिती चिखली व तालुका विज्ञान संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ डिसेंबर २०२५ रोजी चैतन्य गुरुकुल अँड ज्यु. कॉलेज चिखली येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी, निंबध लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १६ डिसेंबर रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत जि. प. हायस्कूल, मंगरूळ नवघरे येथील अंशकालिन कला निदेशक श्री रामेश्वर तोंडे हे शिक्षक शैक्षणिक साहीत्या मध्ये तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

रामेश्वर तोंडे हे सतत विज्ञान प्रदर्शन, शिक्षक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य, लोकगीत,लोक नाटिका,कवीता अगदी हिराराने भाग घेऊन शाळाचे,गावाचे नाव सतत मोठे करत असतात. यामुळे शाळेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला.  हे यश मिळविण्यासाठी शाळा समिती अध्यक्ष  रामेश्वर धमक, शाळेचे प्राचार्य वसंत गाडेकर गुरुजी, शिक्षक,विद्यार्थी व इतर कर्माचा-यांनी कौतूक करून अभिनंदन केले.