महेंद्र वानखडे ग्रामीण प्रतिनिधी 

 ग्रामपंचायत च्या आठ  अ मध्ये नोंद असलेल्या क्षेत्रफळा पेक्षा जास्त क्षेत्रफळाचे बांधकाम  हम रस्त्यावर केल्यामुळे  हे अतिक्रमित बांधकाम हटवण्यासाठी काही नागरिकांनी ग्रामपंचायत पिंपळखुटा यांच्याकडे तक्रार दाखल केल्यावर  ग्रामपंचायत मार्फत अतिक्रमणकर्ते युसूफ शहा अयुफ शाह यांना नोटीस दिली असता सदर अतिक्रमणकर्त्याने तहसीलदार गट विकास अधिकारी आणि चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देत 22 डिसेंबर 2025 रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. गणेश तुळशीराम माडोकार यांनी 15 ऑगस्ट  2025 ग्रामपंचायत पिंपळखुटा यांना निवेदन देत हम रस्त्यात युसुफ शहा यांनी केलेले अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती.

 चौकशी अंती युसुफ शहा यांच्या जागेचे आठ अ नुसार एकूण क्षेत्रफळ 1089 असताना त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे लक्षात आल्यावर ग्रामपंचायत पिंपळखुटा यांनी त्यांना रीतसर नोटीस बजावली. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला हे कारण सांगून युसुफ शहा यांनी आत्मदहन करणार असल्याचा भावनिक आधार घेतल्याचा आरोप गणेश माडोकार यांनी केला. माध्यमांशी बोलताना ग्रामपंचायत पिंपळखुटाच्या सरपंच सो अलकाताई सुभाष वाहोकार यांनी अतिक्रमण कर्त्याला दिलेली नोटीस ही नियमानुसार दिली असून गावातील काही नागरिकांनी अतिक्रमणकर्त्याच्या  विरोधात तक्रारी दिल्यामुळेच चौकशी केल्यानंतरच नोटीस देऊन अतिक्रमण मोकळे करण्यासाठी निर्देश दिले आहेत. पण स्वतः केलेले अतिक्रमण न हटवता बाकी लोकांनी केलेले अतिक्रमण का  हटवीत नाही  असा प्रतिप्रश्न करून अतिक्रमणकर्त्यांनी आत्मदहनाचा घेतलेला निर्णय हा केवळ ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी घेतला असल्याचा पुनरुच्चारही सरपंच सौ अलकाताई सुभाष वाहोकार यांनी केला. एकीकडे युसुफशाह यांचा आत्मदहनाचा इशारा असतानाच गावातील काही नागरिकही या अतिक्रमणाचे विरोधात उपोषणाला बसण्याच्या तयारीत असून  यामुळे गावात  सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.