Ticker

6/recent/ticker-posts

ठळक बातमी: वाळू माफ माफियांचा धुमाकूळ; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची रिक्षाला भीषण धडक.

 


लक्की राठोड मांडवी नांदेड

दि.25 डिसेंबर 2025 रात्री उशिरा वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने प्रवासी रिक्षेला (ऑटो) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने रिक्षात प्रवाशी नव्हते त्याच्यात चालक व त्याच मित्र होत आणि काही जीवित हानी झाली नाही. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भरधाव वेगाने चालणाऱ्या या वाळूच्या वाहनांमुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आले आहेत.