Ticker

6/recent/ticker-posts

कामरगावच्या मातीत धावले सर्जा-राजा.



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

संस्कृतीचा कणा आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या बैलगाडा शर्यतींचा भव्य शंकरपट कामरगाव येथे नुकताच उत्साहात पार पडला. स्थानिक एकता मंडळाच्या वतीने अमरावती-कारंजा महामार्गालगतच्या मैदानावर २६ ते २८ डिसेंबर दरम्यान या जंगी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या थरारात विदर्भ आणि राज्याच्या विविध भागांतून शेकडो बैलजोड्यांनी सहभाग नोंदवून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

शंकरपटाचे उद्घाटन आमदार सईताई डहाके आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकीरड यांच्या हस्तेकरण्यात आले. सलग तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २८ डिसेंबर रोजी सायंकाळी पार पडला. अ, क आणि गावगाडा अशा तीन गटांत मिळून एकूण ४ लाख रुपयांहून अधिक रकमेची बक्षिसे वितरीत करण्यात आली.अ गट या मुख्य गटात अभिजीत राठोड यांची आनंद-महाकाल जोडी धावण्यात सर्वात वेगवान ठरून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. नसीम खा पठाण यांची देवा-दुर्गा जोडी द्वितीय, तर कैलास हिवाळे व युवराज पटेल यांची लाडक्या सोन्या जोडी तृतीयस्थानी राहिली. याव्यतिरिक्त कु. मिशू अन्विका (बैतूल), लोकेश पवार (हरदा), अनिल काळे (दुधाळा), योगेश जाधव (शिरपूर), प्रमोद पाटील दिवटे, नीतू तिवारी (यवतमाळ), केकान साहेब (किनगाव) आणि कु. रिद्धी पराग (अमरावती) यांच्या जोड्यांनी अनुक्रमे चौथ्या ते अकराव्या क्रमांकापर्यंतची बक्षिसे पटकावली. क गटात ताज खा पठाण (हिवरा) यांची देवा-सेवा जोडी अव्वल ठरली. शेख अदनान (कोल्हापूर) यांची रायफल भैरव जोडी द्वितीय, तर तुषार शेठ डांगे यांची जोडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. या गटात मुकुंदराव हाके, जीवन जाधव, तनु खादवे, जीएसके ग्रुप (नागपूर), रोशन पाटील खडसे, जगदंबा संस्थान (शिवडी), सोपीनाथ संस्थान (चिखली) आणि माऊली ग्रुप (असदपूर) यांच्याजोड्यांनीही यश संपादन केले. गावगाडा गट मधे स्थानिक आणि ग्रामीण स्तरावरील या गटात बजरंग शिंदे (सेमलाई) यांच्या करंट सागर जोडीने बाजी मारली. विजय मारुती गिरी (लाडेगाव) यांची जोडी द्वितीय, तर रणजीत काळे (डोंगरगाव) यांची जोडी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या गटात राहुल गाढवे, बांधीलकी ग्रुप (कामरगाव), शंकरराव जोगी (बेंबळा) आणि गोपाल भेंडे (बांबर्डा) यांच्या जोड्यांनी चमकदार कामगिरी केली. ग्रामीण भागातील या पारंपारिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी एकता मंडळाची कार्यकारिणी, पंचकमेटी आणि निर्णय समितीने अहोरात्र परिश्रम घेतले. हा शंकरपट पाहण्यासाठी कामरगाव परिसरातील हजारो क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.