बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील नागरिकांची सोय व्हावी व त्यांना वेळेत शासकीय प्रमाणपत्र मिळावेत या हेतूने महा -ई-सेवा केंद्र तालुक्यासह गावागावांत सुरू करण्यात आली आहेत. मात्र सध्या महा-ई- सेवा केंद्र चालकांची तहसिलदार बाई माने यांच्या कृपाआशिर्वादाने मनमानी सुरू असून, त्यांच्यामार्फत सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. दाखला लवकर मिळण्यासाठी जादा पैशाची मागणी होत असून क्लार्क पासून तहसिलदारांपर्यंत हप्ते दिल्याशिवाय दाखला मिळणे कठिण झाले आहे . दहिवडीच्या कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी लक्ष घालून हप्तेखोरीला लगाम घालावा , अशी अपेक्षा तालुक्यातील जनता करित आहे
.पूर्वी खटाव तालुक्यात फक्त तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र अस्तित्वात होती. तिथून सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे काढून घेता येत होती; परंतु तालुक्यात खेडोपाडी सुविधा व सर्वांची सोय होण्यासाठी बाह्य यंत्रणेमार्फत महा- ई सेवा केंद्राच्या रूपात सुरू आहेत. यांच्यावर कोणाचेही निर्बंध असल्याचे दिसत नाही. त्यामुळे केंद्रचालक .मनमानी पद्धतीने कारभार करत असून, सर्वसामान्य नागरिकांकडून शासनाच्या नियमापेक्षा कितीतरी पटीने आगाऊ रक्कम आकारत आहेत . नागरिकांची मोठया प्रमाणावर लूट करत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे .केंद्रचालक प्रमाणपत्र काढण्यास गेलेल्या नागरिकास कसल्याही प्रकारची पैसे घेतलेली पावती देत नाहीत . तसेच पूर्वी तहसिलमधील सेतू केंद्रातून प्रमाणपत्र कधी मिळणार याची तारखेची पावती दिली जात होती पण सध्या महा ई केंद्रातून तोंडी सांगितले जाते . त्यामुळे प्रमाणपत्र कधी मिळणार हे ठामपणे सांगितले जात नाही .. त्यामुळे प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यास ग्रामीण भागातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बऱ्याचशा केंद्रामध्ये प्रमाणपत्र रेट लावले नसल्याचे पहावयास मिळते. विविध प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी महा- ई सेवा केंद्रामार्फत अतिरिक्त रक्कम शासनाची आणि सामान्य नागरिकांची लूट खटाव तालुक्यात सुरू आहे.
संबंधित चालकास नागरिकांनी एवढे पैसे कसे काय घेता विचारले असता, वर पैसे द्यावे लागतात , तरच सही होते , असे सांगण्यात येते.कोट:खटाव तालुक्यातील महा ई-सेवा केंद्रामार्फत जे प्रमाणपत्र काढले जातात. त्याची रीतसर छापील पावती देण्यात यावी. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होणार नाही. यामुळे महा-ई सेवा केंद्राची पारदर्शकता दिसून येईल. . राहुल कदम , माजी ग्रामपंचायत सदस्य बुध
कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी उज्वला गाडेकर याबाबतीत काय पावले उचलतात , याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे .
-





Social Plugin