बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव ता खटाव येथील प पु श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त बुधवार दि १७ डिसेंबर ते रविवार दि २१ डिसेंबर या कालावधीत भरवण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाचा मंडप उभारणीचा शुभारंभ मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज , बारामती अॅग्रीकल्चरचे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांच्या हस्ते व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत पूजाअर्चा व श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ . सुरेश जाधव , रणधीर जाधव ,संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख , गौरव जाधव , युवा नेते सुशांत निंबाळकर ,स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे , विशाल माने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेअरमन संतोष वाघ म्हणाले, श्री सेवागिरी महाराजांची यात्रा ही शेतकऱ्यांची यात्रा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक माहिती, यंत्रसामग्री, प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांची माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळावी म्हणून ट्रस्ट कृषी प्रदर्शनाचे आयोजन करीत आहे. या प्रदर्शनात ३०० हून अधिक स्टॉल असणार आहेत. या कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करुन या कृषी प्रदर्शनाच्या स्टॉल बुकिंगसाठी देवस्थान ट्रस्टशी संपर्क करावा असे त्यांनी नमूद केले.
छायाचित्र _ पुसेगाव _ श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त भरवण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषिप्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ करताना मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज, राजेंद्रदादा पवार ,ट्रस्ट चेअरमन संतोष वाघ ,सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थ (छाया- प्रकाश राजेघाटगे)





Social Plugin