पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीला लागून असलेले आणे पठार हे गाव आणि त्याच्या परिसरातील अनेक गावांची मुख्य बाजारपेठ म्हणजे आने. याच्या अगदी शेजारीच अहिल्यानगर जिल्ह्याची हद्द असल्याने हा संपूर्ण भाग व्यवहारदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
पण *आणे–नांदूर पठार* हा रस्ता वर्षानुवर्षे अत्यंत दयनीय अवस्थेत होता. अनेक वेळा मागण्या झाल्या तरी रस्त्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. परंतु काही दिवसांपूर्वी *शरद दादा सोनवणे* हे *वैकुंठवासी राजेंद्रशेठ चौधरी* यांच्या दशक्रिया विधीसाठी *नांदूर पठार* येथे आले होते. यावेळी भाषणातच *भावी जिल्हा परिषद सदस्य रविंद्रशेठ राजदेव* यांनी *आणे–नांदूर पठार रस्ता* डांबरीकरण करण्याची मागणी आमदार महोदयांकडे मोठ्या ठामपणे मांडली.
*त्या क्षणीच शरद दादांनी स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले — *“तुमचा विषय मार्गी लागला समजा!”*
आणि खरोखरच काही दिवसांतच रस्त्याच्या कामाला अधिकृत मंजुरी मिळाली व कामाला सुरूवात झाली.
याबद्दल कृतज्ञता म्हणून *नांदूर पठार गावचे मा.सरपंच तसेच भावी जिल्हा परिषद सदस्य* *रविंद्रशेठ राजदेव* यांनी *शरद दादांचा* सत्कार करून मनःपूर्वक आभार मानले.
आज या रस्त्याचे उद्घाटन होणार होते, परंतु *आमदार* महोदयांनी *— “काम पूर्ण आणि दर्जेदार झाल्यावरच उद्घाटन करा; प्रथम कामाची गुणवत्ता महत्त्वाची,” असे स्पष्ट निर्देश संबंधित ठेकेदार तसेच ग्रामस्थांना दिले.*





Social Plugin