Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यातील घुबड फेस्टिव्हल मध्ये आदमपूर येथील शाळांचा सहभाग....





●ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा व महाळप्पा पटने विद्यालयातील विद्यार्थांचाही डिसेंबर च्या सुरूवातीस पिंगोरी,पुण्यात संपन्न झालेल्या ६ व्या भारतीय घुबड महोत्सवात अमूल्य सहभाग राहिला आहे.भारतातील तब्बल दहा हजार कलाकृतींसह आदमपूर शाळेतील मुलांच्याही घुबडांवरील चिञांना स्थान देण्यात आले.

घुबडांचे संवर्धन व्हावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवत पुण्यातील इला फाउंडेशन,टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेईकल्स व पिंगोरी ग्रामपंचायत वतीने दरवर्षी विविध भागात हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवात भारतातील, महाराष्ट्रातील शाळांचा, वन्यजीव प्रेमी,अभ्यासक,संशोधक,पञकार आदिंचा सहभाग असतो.

सदरील शाळेतील सहभागी मुलांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह त्यांना फाऊंडेशन तर्फे सुपूर्द करण्यात आले.यावेळी महाळप्पा पटने विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर लगडे,जि.प.मुख्याध्यापक विठ्ठल अंगरोड, सर्पमित्र राजेश मुंडकर,वन्यजीवप्रेमी जाफर आदमपूरकर, सहशिक्षक शेख मुतन्याळकर, प्रल्हाद हांद्रे, रामराव तुकडे,दिलीप इबिते,राहूल भद्रे,शेषेराव पांचाळ,

स्वाती अडबलवार,कल्पना जाधव,अर्चना जळपतराव, शिवराम इंगळे,हणमंत भुसावळे आदिंची उपस्थिती होती.