Ticker

6/recent/ticker-posts

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल गोंदी,शाळेत विज्ञान प्रदर्शन व आनंदनगरी उत्साहात साजरी



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

अंबड तालुक्यातील गोंदी येथील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन आनंद नगरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कचोर मॅम व परदेशी मॅम यांनी केले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापून विज्ञान प्रदर्शनास सुरुवात केली.विद्यार्थ्यांनी प्रयोगांबद्दल माहिती सांगितले.त्या नंतर लगेच मोठ्या उत्साहात आनंदनगरीस सुरुवात झाली.

 या ठिकाणी मोठ्या संख्येने पालक,विद्यार्थी तसेच इतर गावकऱ्यांनी आनंद नगरीचा आनंद घेतला..