मंगेश पुंड @ग्रामीण प्रतिनिधी.
राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याला लाल दिवा मिळेल अशी दाट शक्यता आहे. सदनिका गैरव्यवहारामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.यामुळे आता वसमत विधानसभेचे आमदार राजूभैय्या नवघरे यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी 2024 च्या प्रचाराच्या वेळी वसमत येथे सभेमध्ये राजूभैय्या ला निवडून आणा,मी त्यांना मंत्री करतो असा शब्द दिला होता.
पण नंतर त्यांना डावलण्यात आले होते.पण सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका निवडणुकीनंतर मंत्रीमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. वसमत विधानसभेचे शेतकरी पुत्र आमदार राजूभैय्या नवघरे यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. आमदार नवघरे हे सातत्याने विधानसभेच्या अधिवेशनात शेतकरी,तरूण बेरोजगार, तळागाळातील नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत असतात. आमदार राजू नवघरे यांनी जिल्ह्यातील पक्ष बांधणी मजबूत केली आहे. आमदार राजूभैय्या नवघरे यांना मंत्रीपद दिल्याने मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची नवघरे पक्षबांधणी आणखी मजबूत करून पक्षाला बळ देतील. आमदार नवघरे यांना मंत्रीपद द्या अशी मागणी हिंगोली जिल्ह्यातून होत आहे. हिंगोली जिल्ह्याला मंत्रीपद मिळाल्यास जिल्ह्याचा विकास होईल अशी जनतेची आशा आहे.हिंगोली जिल्हा दीर्घकाळापासून मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्वापासून वंचित राहिलेला असून,आता आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या निमित्ताने हिंगोली जिल्हयाला मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. आमदार नवघरे यांना मंत्रीपद देऊन दादांचा वादा दादा पूर्ण करतील अशी तरूण कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.





Social Plugin