Ticker

6/recent/ticker-posts

सौ. दिपाली जाधव यांचा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक.

          




 बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

सातारा येथे संपन्न होणाऱ्या९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  अशा गटात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

      यामधील निबंध स्पर्धेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गटात जि प प्राथमिक शाळा, गारवडी ता. खटाव शाळेच्या उपशिक्षिका सौ. दिपाली प्रविण जाधव  यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. सध्या त्या जि. प. केंद्रशाळा वडगाव (ज. स्वा) ता. खटाव या ठिकाणी कार्यरत आहेत.

             सौ. दिपाली जाधव यांनी यापूर्वीही यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या तर्फे शिक्षकांसाठी आयोजित राज्यस्तरीय निबंधस्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच १०० शिक्षक क्लब, जालना आयोजित  राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. लिटिल ऊर्जा फाउंडेशन व लोकमत तर्फे आयोजित  पर्यावरण पूरक उपक्रम राबवणाऱ्या  राज्यभरातून १० शाळांची निवड झाली होती त्यामध्ये दिपाली जाधव यांनी सादर केलेल्या उपक्रमाची निवड होऊन गारवडी शाळेला ५० हजार रुपयांचे बक्षिस प्राप्त झाले..       

     शिक्षक व अधिकारी सुलेखन स्पर्धेसाठी खटाव तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  निबंध स्पर्धेतील त्यांच्या या यशाबद्दल खटाव तालुक्याचे गटविकास अधिकारी योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, शिक्षण विस्तार अधिकारी संगिता गायकवाड, शिवाजी कदम, अरुण पाटील, केंद्रप्रमुख संजय दिडके, रफिक मुलाणी, आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.