भोसरीच्या संघाने पटकावला श्री सेवागिरी चषक
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी यात्रोत्सवानिमित्त झालेल्या निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भोसरीच्या भैरवनाथ क्रीडा संस्था कबड्डी संघाने कौलव (कोल्हापूरच्या) शिवमुद्रा कबड्डी संघावर चार गुणांनी मात करत ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस व श्री सेवागिरी चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत २१ निमंत्रित संघांनी सहभाग घेतला.
उपविजेत्या शिवमुद्रा कबड्डी संघाला चषक व ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. तृतीय क्रमांक विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे संघाला २१ हजार व चषक, तर चतुर्थ क्रमांक पटकावलेल्या साईसेवा कबड्डी संघ छत्रपती संभाजीनगरला चषक व ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले.
या स्पर्धेत बेस्ट रेडर राहुल टेके (छत्रपती संभाजीनगर), बेस्ट डिफेंडर सिद्धेश पांचाळ (ठाणे), मॅन ऑफ द मॅच आदित्य चौगुले (भोसरी), मॅन ऑफ द सिरीज साहिल पाटील (कोल्हापूर) हे खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले.
पुसेगाव येथील यात्रा स्थळावर झालेली निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या नियमानुसार झाली. स्पर्धेसाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, श्री सेवागिरी स्पोर्टस् अॅकॅडमीचे आजी-माजी खेळाडू व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभमठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.





Social Plugin