Ticker

6/recent/ticker-posts

प्राणि क्लेस प्रतिबंधक सदस्य रघुनाथ भुते यांनी अजगर सापाला पकडुन नैसर्गिक सानिध्यात सोडत दिलें जीवनदान

 


जितेंद्र बहेकार प्रतिनिधी आमगाव

आमगांव, शहरातील देवरी रोड स्थित बाबूजी (मानकर) पेट्रोल पंप च्या बाजूला किशन जी मानकर यांच्या घरी अचानक एक अजगर साप दबा धरून बसलेला आहे ही माहिती आमगांव नगर परिषद कर्मचारी सुरेंद्र बोहरे यांनी शनिवारी रात्री ०९.०० च्या  सुमारास गोदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी सदस्य रघुनाथ भुते यांना कळवली असता,त्यांनी गोदिंया जिल्हा वन विभाग अधिकारी सहाय्यक वनरक्षक पवन कुमार जोग सहाय्यक वनरक्षक अधिकारी सचिन डोंगरवार,गोंदिया जिल्हा वन संरक्षक पथ प्रमुख रवी भगत सर,आमगाव वन विभाग आरएफओ अधिकारी सौ अभिलाषा सोनटक्के मॅडम यांच्या मार्गदर्शनात तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अजगर सापाला पकडले व त्यास जीवनदान देत त्यास त्याच्या नैसर्गिक परिवासात निर्जन स्थळी सोडून दिले.अत्यन्त भारी भारकंम अजगर सापाला पकडण्या दरम्यान त्यांना सर्पमित्र दिनेश बहेकार,व दिनू थेर यांचीपण मोलाची मदत मिळाली.