महेंद्र वानखडे ग्रामीण प्रतिनिधी
पिंपळखुटा 12 डिसेंबर 2025
गावात जागोजागी अतिक्रमण असताना केवळ एकाच व्यक्तीला वारंवार नोटीसा पाठवून मानसिक त्रास दिल्याबद्दल 22 डिसेंबर 2025 रोजी पिंपळखुटा येथील युसुफ शहा हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर 22 डिसेंबर रोजी आत्मदहन करणार आहेत. युसुफ शहा यांनी पातुरते तहसीलदार , पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार यांना निवेदन देत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. पातूरचे तहसीलदार यांनी गट विकास अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पिंपळखुटा गावात चान्नी वाहळा, उमरा आणि राहेर अडगावं रस्ता अतिक्रमनाने व्यापला असताना केवळ एकाच व्यक्तीला पक्षपातीपणांनी दिलेली नोटीस हा गावात चर्चेचा विषय बनली आहे.





Social Plugin