Ticker

6/recent/ticker-posts

आई - वडील गेल्याचे दुःख न सागण्यासारखं असतं - गजानन महाराज



बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

जोपर्यंत आई-वडील जिवंत आहेत तो पर्यत त्यांना संभाळा, डोंगराच्या आड गेलेला सुर्य पुन्हा दिसेल पण मातीआड गेलेले आई-वडील पुन्हा कधीच दिसणार नाहीत. एक वेळा पंढरपूरला जावू नका पण आईवडिलांची सेवा करा असे मत सुप्रसिद्ध किर्तनकार हभप गजानन महाराज धर्माधिकारी रामनगरकर यांनी व्यक्त केले.

        खटाव तालुक्यातील काटकरवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व पुसेगाव येथील श्रीराम ट्रेडर्सचे संचालक कै. वसंत तुकाराम निकम यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोरेगाव खटावचे आमदार महेशदादा शिंदे यांच्या सौभाग्यवती डॉ प्रियाताई शिंदे, माजी प स सदस्य अर्जुनदादा वलेकर, शिवसेना खटाव तालुका प्रमुख ज्ञानेश्वर काटकर, अहमदाबाद बीएसएफ चे सागर निकम, हभप अमृत नलवडे, युवा उद्योजक सुर्यकिरण निकम, रणजित काटकर, विकास निकम, अविनाश निकम, पोलिस पाटील रविंद्र काटकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

              हभप गजानन महाराज पुढे म्हणाले की, जीवनामध्ये आई-वडील गेल्याचे दुःख न सांगण्यासारखे असते, आई-वडिलांची उणीव कधीही भरून निघत नाही. ज्या दिवशी जन्म देणारे आई-वडील निघून जातात त्या वेळेपासून आपली मायेची गरीबी चालू होते. नातवड्यांच्या जीवनातील पहिला आणि शेवटचा मित्र आजी-आजोबा असतात. या किर्तन सेवेस कटगुण येथील श्रीमद जगदगुरु आध्यात्मिक वारकरी गुरुकूलचे विद्यार्थी आणि काटकरवाडी व पंचक्रोशीतील भजनी मंडळांची साथ लाभली. उपस्थितांचे स्वागत निलेश निकम व अमृत नलवडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नलवडे यांनी केले तर आभार अमृत नलवडे यांनी मानले. कार्यक्रमास जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश काटकर, गणेश निकम, जयराम निकम, आनंदराव काटकर, विलास काटकर, युवराज काटकर, विठ्ठल काटकर, प्रताप काटकर, आबासो काटकर, धनराज काटकर, अनिल काटकर, विजया काटकर, पूनम भोसले, माधुरी इंदलकर, रेश्मा काटकर आदिंसह काटकर परिवार, आप्तेष्ट, मित्रपरिवार व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

छायाचित्र - काटकरवाडी येथे पुण्यस्मरण कार्यक्रमात  हभप गजानन महाराज यांचा सत्कार करताना अमृत नलवडे