Ticker

6/recent/ticker-posts

श्री सेवागिरी महाराज यात्रा दि .१४ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत यात्रोत्सव

 


पुसेगाव दि . [प्रतिनिधी ] 

श्री सेवागिरी महाराज यात्रा   दि .१४ डिसेंबर  ते २४ डिसेंबर  या कालावधीत यात्रोत्सव सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पुसेगाव मार्फत विविध सेवा सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रभारी सरपंच विशाल जाधव व ग्रांमपंचायत अधिकारी ए जे . नागरगोजे यांनी दिली .  संपूर्ण गावातील स्ट्रीट लाईटची आगाऊ कामे करण्यात आली असून सर्व अंतर्गत नाले सफाई तसेच आरोग्य विषयक विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण गावांमध्ये साथ रोग प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूर फवारणी करण्यात आली आहे सर्व ग्रामस्थांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. गावातील १५ हातपंपाची देखभाल दुरुस्ती करून ते चालू करण्यात आले आहेत. 

आवश्यकतेप्रमाणे टीसीएल पावडर, तुरटी, बीएससी पावडर, चा साठा ठेवण्यात आला आहे. सर्वत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नेमणूक करण्यात आली असून नियमित पाणी परीक्षण ओटी टेस्ट करण्यात येत आहेत. गावातील सर्व जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन खाते मार्फत करण्यात आले असून यात्रा स्थळावर येणाऱ्या जनावरांचे देखील लसीकरण करण्यात येत आहे. चालू वर्षी श्री सेवागिरी महाराज प्लास्टिक मुक्त यात्रा अभियान राबविण्यात येत आहे. गावामध्ये व यात्रा स्थळावर याबाबत नियोजन करण्यात आले आहे. सिंगल न्यूज प्लास्टिकचा वापर आढळून आल्यास ग्रामपंचायतीमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे इतर प्लास्टिक वेगळे साठवून ठेवण्याबाबत व्यवसायिकांना सूचना देण्यात आल्या असून ते ग्रामपंचायतीमार्फत जमा करून प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे. सर्व भाविकांसाठी आरोग्य खात्यामार्फत एच बी तपासणी, कॅन्सर विषयक तपासण्या, आयुष्यमान भारत विषयक कॅम्पचे आयोजन बैल बाजार, पोलीस स्टेशन व मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेले असून त्याचा लाभ  सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीचे  प्र . सरपंच विशाल जाधव व ग्रामपंचायत अधिकारी  ए .जे नागरगोजे यांनी केले आहे.