🌸देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के.
देवगड व्यापारी व पर्यटक संस्था यांच्या सौजन्याने समुद्रकिनारा देवगड या बीचवर विविध प्रकारचे कार्यक्रम नवीन वर्षासाठी आयोजित केले गेलेले आहेत याचे उद्घाटन माननीय मत्स्य व बंदर विकास मंत्री माननीय आमदार नितेश नारायणराव राणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची आखणी देवगड पर्यटक व व्यापारी संघटना "जल्लोष" हा कार्यक्रम या नावाने आखली गेलेली आहे. हा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा स्वरूपात असतो. या कार्यक्रमांमध्ये गाणी, डान्स, नाट्य, विनोदी, वाद्य, संगीत, असे अनेक कार्यक्रम या" जल्लोष" कार्यक्रमात आखलेले आहेत. देवगड समुद्रकिनाऱ्यावर हे पंधरावे वर्ष "जल्लोष"या कार्यक्रमाचे आहे. 30 व 31 डिसेंबर या दिवशी वर्ष अखेरीचे हे दोन दिवस अत्यंत उत्साहात व आनंदात फटाक्याच्या आतषबाजीत व उत्साही लोकांच्या सानिध्यात देवगड बीचवर साजरे होणार आहेत. या कार्यक्रमात पहावयास येणाऱ्या प्रेक्षकांना सर्व सुख सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. गाड्यांची पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे.
माननीय साक्षी प्रभू या प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाला शोभा आणणार आहेत. व अनेक मान्यवर सरकारी पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी देवगड पर्यटक व व्यापारी संघटना व स्थानिक कार्यकर्ते व पोलीस स्टेशन नी घेतलेली आहे. कुठेही अनुचित प्रकार होऊन नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवले गेलेले आहेत. असा हा "जल्लोष" कार्यक्रम 31 तारीख ला फटाक्याच्या आतषबाजीने नवीन वर्षाची स्वागत करणारा असा आहे. अमित हडकर यांचे म्युझिक शो सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दिवंगत संजय दुरी यांच्या नावाने आदर्श कार्यकर्ता हा पुरस्कार सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. असे अनेक कार्यक्रम नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने देवगड बीचवर ठेवले गेलेले आहेत. तेव्हा आपण सर्व मनोरंजन प्रेमी ने या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुसज्ज राहावे व नवीन वर्षाचे स्वागत करावे. तसेच देवगड बीचवर अत्यंत मनमोहक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे. व तेथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल सुद्धा लावण्यात आलेले आहेत. तेव्हा अशा या 2025 सालाला निरोप देऊन 2026 चे नवीन वर्षाचे स्वागत देवगड बीचवर करण्यात येणार आहे





Social Plugin