Ticker

6/recent/ticker-posts

जालना जिल्हा भोकरदन, अंबड परतुर येथे नगरपरिषद निवडणूक सरासरी त्रेहत्तर टक्के मतदान अंबड येथील उमेदवार चां पोलीसांनी माराहाण केल्याचा आरोप ॽ

 


 जिल्ह्यातील नगर परिषद शांततेत मतदान .जालना जिल्हा नगर परिषदेत भोकरदन, अंबड,परतुर चुरशीची लढत सर्वं पक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ॽ

 जालना प्रतिनिधी संजीव पाटील

जालना जिल्ह्यातील भोकरदन  , अंबड,परतुर तीन नगर परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी शांततेत मतदान सरासरी मतदानाची टक्केवारी 73% अंबड मध्ये उमेदवार चा पोलीसांनी माराहाण केल्याचा  आरोप  ॽ जालना जिल्हा प्रतिनिधी संजीव पाटील । काल महाराष्ट्र राज्यात नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या . जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, परतुर या तिन नगर परिषद साठी अध्यक्ष  तसेच नगर सेवक पदासाठी मतदान घेण्यात आले.   जिल्ह्यातील भोकरदन अंबड परतुर येथे सरासरी त्रेहत्तर  टक्के 73%   मतदान झाल्याचे  प्रशासना कडुन सांगण्यात आले. भोकरदन येथील प्रभाग सहा मध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप निवडणूक प्रतिनिधी नवी केला . तसेच दिव्यगं व्यक्ती चे घरपोच मतदान घेण्यात आले नसल्याने मत दाना  पासुन वंचित  राहील्या चां प्रकार घडला आहे. अंबड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप खरात आणि पोलीसामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती आहे. पोलिस उपनिरीक्षक यांनी आपणास माराहाण केल्याचा आरोप संदीप खरात यांनी केला आहे .अंबड  येथील हा प्रकार वगळता जालना जिल्ह्यातील भोकरदन ,अंबड, परतुर येथे तिनं ही  नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक साठी  मतदान  शांततेत पार पडले.  नेत्यांची प्रतिष्ठा पणाला  भोकरदन नगरपरिषद निवडणूकीत भाजपा  नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि भाजपा आमदार तथा पंचायत राज समिती चेअरमन संतोष भाऊ दानवे ,  माजी आमदार चंद्रकांत दानवे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस,  आणि काँग्रेस पार्टी चे  जिल्हाध्यक्ष राजेंद्र  देशमुख   यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  अंबड मध्ये भाजपा आमदार तथा भाजपा पार्टी जिल्हा अध्यक्ष नारायण कुचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर परतुर  मध्ये  माजी मंत्री भाजपा आमदार बबनराव लोणीकर आणि सुरेश जेथलिया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  नगराध्यक्ष नगरसेवक कोण  21 डिसेंबर रोजी फैसला नगरपरिषद निवडणूक निकाल एकविस  डिसेंबर रोजी लागणार आहे. भोकरदन अंबड परतूर नगर परिषद भाजपाच्या च ताब्यात येईल असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले भोकरदन नगरपरिषद काँग्रेस चां नगराध्यक्ष होईल असे राजेंद्र भाऊ देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितल.तर भोकरदन नगरपरिषद शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस चां नगराध्यक्ष होईल असा विश्वास माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.   जनता कोणच्या बाजुने कौल देते यांचा निर्णय 21 डिसेंबर रोजी होणार आहे.  जालना जिल्हा  त मतदान केंद्रावर  कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त  जालना जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय नोपाणी याच्या मार्गदर्शनाखाली  ठेवण्यात आला होता. भोकरदन येथे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ नितिन कटेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक किरण बिडवे आणि सहकारी  पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.  भोकरदन येथे प्रभाग सहा मध्ये ई.व्ही.एम. मशीन बंद पडल्याची घटना घडली.  भोकरदन नगरपरिषद निवडणूक दोन प्रभागात 20 डिसेंबर रोजी मतदान  न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भोकरदन येथे प्रभाग क्रमांक एक आणि नऊ मतदान घेण्यात आले नाही या प्रभागात 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. एकुण 20 वार्ड प्रभाग असुन अठरा प्रभागात 2 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. एकुण 26  मतदान केंद्रावर  मतदान घेण्यात आले.  काही जिल्हा त निवडणूक आयोगाने न्यायालयाने प्रचार पुर्ण झाल्यावर वेळेवर स्थगिती देण्यात आल्या मुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.