Ticker

6/recent/ticker-posts

वाहन धारकाच्या जीवाशी खेळ.






प्रतिनिधी गोपाल चंदनसे

नुकत्याच दोन वर्षापूर्वी तयार झालेल्या NH 548C महामार्गावरील सुरक्षा गार्ड, काही पडलेल्या अवस्थेत तर काही लंपास झालेले आहेत, महामार्ग तयार करताना खूप मोठा खर्च हा बाजूच्या सुरक्षा गार्ड वर केला जातो तयार झालेल्या महामार्गावर प्रत्येक वळणावर वाहन धारकाला रस्ता समजावा आणि येणाऱ्या. जंगली जनावरा पासून संरक्षण व्हावे त्यासाठी सुरक्षा गार्ड बसवले जाते पण हे खाली जमीन वर पडलेले आहेत तर काही तेथून गायब झाले आहे या कडे बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे , गायब झालेल्या गार्डच्या जागेवरून जंगली जनावरे सरळ रस्ता ओलांडत आहेत आणि घन दाट जंगल असल्यामुळे वाहन धारकाच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे जंगली जनावरा मुळे अपघाता मधे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.