ग्रामीण प्रतिनिधी भाग्यश्री धकाते उमरेड
उमरेड - महादेव पोटे यांच्या घराला अचानक आग लागली.आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरातील साहित्याचं नुकसान झाले. व त्यांची फ्रिज, वॉशिंग मशिन, कपाट, दिवाण व इतर साहित्य जळून खाक झाले. महादेव पोटे हे बाहेरगावी गेले असता आज सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घरात अचानक आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याचं नुकसान झालं असून फ्रीजमध्ये कॉम्प्रेसर तुटल्याने आगीने संपूर्ण घराला आटोक्यात घेतलं. आगीचे धुवे आणि त्या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. या प्रभागातील नवनियुक्त नगरसेवक विकास लांजेवार हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला फोन करून पाचारण केले. अग्निशामक दलाची गाडी आगदी वेळेवर घटनास्थळी पोहोचली.
आणि आग नियंत्रण आणण्यामध्ये मोठा यश संपादन केलेले आहे.महादेव पोटे यांची मुलगी लता महादेव पोटे ही १० वीत शिकते ही एकटीच घरी होती. महादेव पोटे काही कामानिमित्त बाहेर गावी गेले असतांना घरात आग लागली. आग हळूहळू इतकी लागली की आगीचं रूप पाहून अनेक नागरिक या ठिकाणी एकत्र झाले. ही आग आजुबाजूला पोहोचू नये यासाठी पाण्याचा मारा केला. मात्र आग नियंत्रणात येत नव्हती. शेवटी नगर परिषद अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणलेली आहे. महादेव पोटे यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र समोर येत आहे.





Social Plugin